आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 100 आणि गोव्यात 20 जागा लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असही संजय राऊत म्हणाले. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, गुजरात राज्याचा मुख्यमंत्री बदलणं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असेही राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या भूमिकेमुळे संभ्रम!
शिवसेना उत्तर प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत 403 जागांवर लढणार असल्याचे ठरले होते. तसे त्यांच्याकडून पत्रकही जारी करण्यात आले होते. मात्र अवघ्या 24 तासात महाराष्ट्र शिवसेनेने घेत 100 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.