आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारला 6 महिने झालेत. या 6 महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेव्हापासून सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली होती. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
संजय शिरसाट शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले - 'मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगितले. या अडचणी 15 तारखेपर्यंत दूर होतील. त्यानंतर 20-22 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज आहे,' असे ते म्हणाले. 'सरकारमधील अनेक राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री भरायची आहेत. काही गोष्टींमुळे विस्तार रखडलाय. विस्तार होणार नाही असे नाही, तो करावाच लागणार आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेना संपूर्ण रिकामी होणार
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. ते म्हणाले की, 'येत्या काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे रिकामी होईल. शिवसेनेचे उर्वरित आमदार पुढील 8-10 दिवसांत शिंदे गटात सहभागी होतील.
शिवसेनेत सकाळी सुरू असलेल्या भोंग्यामुळे ही वेळ येईल. विशेषतः भविष्यात निवडणूक लढवायची किंवा नाही असा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरेंपुढे उभा राहील.'
उद्धव शांत का कळत नाही?
'आमचा उठाव झाला तेव्हाही अशी प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे यांना मिसगाईड करणारे लोक आहेत. त्यामुळे शिवसेना संपत आहे. आजही तेच सुरू आहे. कोण बोलत आहे? काय बोलत आहे? त्यांना पक्षाशी काहीच देणेघेणे नाही. या लोकांनी कधी थेट जनतेत जाऊन काम केले नाही. शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे. पण उद्धव ठाकरे शांत का आहेत हे कळत नाही,' असे शिरसाट म्हणाले.
अंबादास दानवे राऊतांचे शिष्य
शिरसाटांनी यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही निशाणा साधला. 'अंबादास दानवे हे संजय राऊतांचे शिष्य आहेत. त्यामुळे ते त्या भूमिकेत बोलतात. राऊत आणि त्यांचे बोलण एकमेकांना साजेसे असते,' असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.