आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार यांची घोषणा:‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता, आठविभागीय कार्यालये सुरू करणार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे.

सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांत सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थिंनीसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात.

सारथीसाठी १ हजार काेटींची मागणी
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, पवार यांच्यासमाेर १२ मागण्या ठेवण्यात अाल्या आहेत. त्यांची प्रक्रिया पूर्ण हाेण्यास २१ दिवस लागणार असल्याचे सांगण्यात अाले. सकारात्मक चर्चा झाली असली तरी लातूरला २१ जून राेजी मूक अांदाेलन करण्यात येणार आहे. सारथीसाठी एक हजार काेटींची मागणी करण्यात अाली आहे.

बातम्या आणखी आहेत...