आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:कोयना धरण पायथा विद्युत गृहातून  2100 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाबळेश्वर, नवजा, कोयनेसह पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे.

मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगगृहातून आजपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीमध्ये सोडले जात आहे. या विसर्गामुळे कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाबळेश्वर, नवजा, कोयनेसह पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद सरासरी 41 हजार क्युसेक पाणी येत आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीत पाणी सोडले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधा पाऊस सुरू असल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या लोकवस्ती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजनांबाबत आवश्यक ती खरबदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.