आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापशिंगे (मिलीटरी) या गावाने देशासाठी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. देशाला तसेच महाराष्ट्राला हेवा वाटेल असा या गावाचा विकास केला जाईल, अशी ग्वाही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
अपशिंगे (मिलीटरी) येथे आयोजित 'जय जवान जय किसान सन्मान' मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी सैनिक कल्याण विभागाचे पुणे विभागाचे उपसंचालक आर.आर. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, निवृत्त बिगेडियर मोहन निकम, निवृत्त कॅप्टन उदाजी निकम, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच उमेश निकम आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध तसेच स्वातंत्र्य चळवळीत अपशिंगे (मिलीटरी) गावातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. या गावाच्या विकासासाठी संबंधित विभागांना आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या असून यामध्ये रस्ते, भूमीगत गटारे, आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला जाईल. गावाचा विकास जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच सीएसआर फंडातून विकास करण्यात येईल.
गावात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. शेतकरी उत्पादक गट, गट शेती तसेच महिला बचत गटांना शासनामार्फत सढळ हाताने मदत केली जाईल. तसेच अपशिंगे (मिलीटरी) या गावाच्या विकासासाठी कुठेही निधीची कमतरता पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही भुसे यांनी दिले.
प्रास्ताविक राजू शेळके यांनी केले. या कार्यक्रमात वीर माता, वीर पत्नी, प्रगतशील शेतकरी यांचा सत्कारही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.