आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Says Narayan Rane Says Victims Of Taliye Village Get House From Pradhan Mantri Awas Yojana; News And Live Updates

तळिये दुर्घटना:पंतप्रधान आवास योजनेतून तळियेतील दुर्घटनाग्रस्त लोकांना घरे बांधून देण्यात येणार - केंद्रीय मंत्री राणे यांची मोठी घोषणा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जाणार

रायगड जिल्ह्यातील महाडजवळील तळिये गावात दरड कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये डोंगराच्या ढिगाऱ्याखाली 35 घरे गडप झाली असून यामध्ये 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतर्गंत सर्वांना घरे बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आज तळिये गावाची संपूर्ण पाहणी केली असून लोकांशी संवाद साधला आहे. दरम्यान, त्यांच्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रविण दरेकरदेखील उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जाणार
ते पुढे म्हणाले की, या दुर्घटनाग्रस्त गावांचा पुनर्वसन केले जाईल. त्याचसोबत त्यांना पंतप्रधान आवास योजना आणि राज्य सरकारकडून चांगली वसाहत निर्माण करुन दिली जाणार आहे. नारायण राणे यांनी या गावाची पाहणी करत लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारकडून या दुर्घटनाग्रस्त गावांना मदत दिली जात आहे. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत पक्की घरं देण्याची योजना आहे, असं आश्वासन नारायण राणेंनी यावेळी दिले आहे.

काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
दुर्घटनेतील प्रत्येक कुटुबांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. तुम्ही फक्त स्वत:ची काळजी घ्या इतर सर्व आमच्यावर सोडा असे मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना धीर देताना सांगितले. कागदपत्राची कोणतीच काळजी करु नका सर्वाना योग्य ती मदत दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...