आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्कापात?:मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागात आकाशात दिसली उल्कापातासारखी दृश्ये; सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून आकाशात पश्चिम दिशेकडे अनेक ठिकाणी उल्कापातासारखा प्रकाशमान जळत्या वस्तूप्रमाणे दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. उल्कापाताप्रमाणे अतिशय वेगाने या जळत्या वस्तू जमिनीच्या दिशेने येताना दिसत होत्या. या वेळी अनेकांनी ही दृश्ये आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे अवशेष अवकाश यान, किंवा अंतराळ प्रयोशाळा किंवा उपग्रहाचे अवशेष असू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील अनेक भागात आज सायंकाळच्या सुमारास ही दृश्ये एखादा उल्कापात व्हावा अशी दिसली. काहींना हे तुटलेले तारे वाटले. त्या ताऱ्यांना पाहून दंतकथेप्रमाणे अनेकांनी आपल्या मनातील इच्छा सुद्धा बोलून दाखवली. मात्र, हा उल्कापात आहे की तुटलेल्या उपग्रहाचे अवशेष आहेत असे प्रश्न अनेकांना पडले.

खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशातील एखादे सॅटेलाईट पडले असण्याची शक्यता आहे. अथवा एखादी मोठी उल्का असावी कारण आज 3 उल्का पृथ्वी जवळून जाणार होत्या. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात दिसली आहे. उल्का अरबी समुद्रात पडली असण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचेच तुकडे

न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत आहे. अशी मागणी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...