आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Seeing The Corona Infected Father Suffering, The Son Said Give A Bed Or Give An Injection And Kill It; People Running To Telangana For Treatment; News And Live Updates

राज्यातील कमी संक्रमित जिल्ह्यातील परिस्थिती:आजारी पित्याला त्रास होताना पाहून मुलगा म्हणाला, एक तर बेड द्या अन्यथा इंजेक्शन देऊन मारुन टाका

गडचिरोली/ चंद्रपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किशोर नारशेट्टीवार (41 वर्ष) हे कोरोनाबाधीत असल्याने मृत्यूशी झुंज देत होते.

महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना महामारीचा संसर्ग शिगेला पोहचला आहे. दरम्यान, यामुळे राज्यभरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांची कमतरता भासत आहे. सरकारी आकड्यांनुसार, राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हात कोरोनाचा संसर्ग कमी असल्याचे दिसते. परंतु, या जिल्ह्यातही कमी रुग्ण असताना एवढी मोठी समस्या जाणवत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील शासन प्रशासन आणि आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, राज्यात 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण चालू आहे. राज्यात कडक संचारबदीदेखील लागू आहे. तरीपण कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही.

चंद्रपूर जिल्हा हॉस्पिटलसमोर तेथीलच किशोर नारशेट्टीवार (41 वर्ष) हे कोरोनाबाधीत असल्याने मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना रुग्णालयात बेड्स न मिळाल्यामुळे त्यांनी सतत दोन दिवस खाजगी आणि सरकारी रुग्णालय पिंजून काढला. विशेष म्हणजे या रुग्णांचे घर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयांपासून अगदी जवळच होते. तरीदेखील त्याला ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलाने वडिलांच्या उपचारसाठी रात्री साडे अकरा वाजता तेलंगाणा गाठले. परंतु, तेथेही बेड्स उपलब्ध न झाल्याने असाह्यपणे वापस येऊन चंद्रपूर जिल्हा रुग्णालयासमोर रुग्णवाहिका उभी केली.

हे सर्व सांगताना त्यांचा मुलगा सागर भरल्या डोळ्यांनी म्हणतो की, रुग्णवाहिकेत ठेवलेले ऑक्सिजन संपत चाललेलं आहे. माझे बाबा शेवटची घटका मोजत आहे. या परिस्थितीत मला काय करावे कळत नाही आहे. एकतर त्याला बेड्स उपलब्ध करुन द्या नाहीतर इंजेक्शन देऊन मारुन टाका.

बातम्या आणखी आहेत...