आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री विलास उंडाळकर यांचे निधन, कराड दक्षिण मतदारसंघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केले

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उंडाळकर यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते

राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते विलास उंडाळकर यांचे सातारा येथे निधन झाले. उंडाळकर यांनी कराड दक्षिण मतदार संघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे उपचारादरम्यान वयाच्या 84 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. उंडाळकर यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...