आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा पुरस्कार:ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना‘मराठी भाषा अभ्यासक’ पुरस्कार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर, रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव

गेली ६० वर्षे मराठी भाषा, वाङ्मय आणि मराठी संस्कृती यावर लेखन करणारे औरंगाबादचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना यंदाचा राज्य सरकारचा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या विविध पुरस्कारांची घोषणा केली. यात विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ पठारे, श्री. पू. भागवत पुरस्कार- शब्दालय प्रकाशन व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत तसेच मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांना जाहीर झाला. हे पुरस्कार मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येतील.

पुरस्कार विजेते

१. विंदा करंदीकर जीवनगौरव : रंगनाथ पठारे (रु.५ लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र)

२. मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार: डॉ. सुधीर रसाळ (रु.२ लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र)

३. श्री.पु. भागवत पुरस्कार : शब्दालय प्रकाशन (रु.३ लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र)

४. मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश

बातम्या आणखी आहेत...