आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:इसापूर धरणाचे सात दरवाजे उघडले, 11958 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्हयासाठी महत्वाच्या असलेल्या इसापूर धरणाचे बुधवारी ता. २२ सकाळी सकाळी सात वाजता ७ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ११९५८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

इसापुर धरणाच्या लाभ क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून त्या सोबतच धरणावर बंधण्यात आलेले बॅरेजेस शंभर टक्के भरून वाहू लागले आहे. सध्या जयपूर बॅरेजेसमधून धरणाच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, सध्या धरणात ९६४ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा झाला असून धरणातील पाण्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता आज सकाळी सात वाजता या धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे. यामध्ये २, १४, ८, ७, ९, ६, १० या दरवाजांचा समावेश असून हे दरवाजे ५० सेंटीमिटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ११९५८ क्युसेकने पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या इशारा प्रकल्प कार्यालयाने दिला आहे. पुढील काळात धरणात येणारी आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग कमी - जास्त केला जाणार असल्याचे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...