आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यमराठी स्पेशल:कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या 7 दिवसांनी झाले सातव यांचे निधन, डॉक्टरांनी सांगितले त्यांना नेमके काय झाले होते

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोना संसर्गाानंतर उपचारादरम्यान पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सातव यांच्यावर मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते.

कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह
19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर 23 एप्रील पासून पुणे येथील जहाँगिर हॉस्पीटल येथे कोविडवर उपचार घेत होते. 29 एप्रील रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचाराच्या 17 दिवसानंतर 9 मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. परंतु 15 मेपासून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले.

सातव यांना सायटोमेगॅल विषाणूची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली होती. रविवारी जहाँगिर हॉस्पीटलने दिलेल्या माहितीनुसार सातव यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता तरीही दीर्घ आजार, शरीरातील विविध अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईतील डॉक्टरांनीही केली होती तपासणी
राजीव सातव यांच्यावर जहाँगिर हॉस्पीटल येथे उपचार सुरु होते, उपचारादरम्यान गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. यासोबतच मुंबईल येथील डॉ. राहुल पंडीत, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरु होते.

सायटोमेगॅलव्हायरस (CMV) संक्रमण काय आहे?
सायटोमेगॅलव्हायरस (सीएमव्ही) चा संसर्ग हर्पिस ग्रुपशी संबंधित व्हायरसमुळे होतो. बऱ्याच रुग्णांमध्ये लक्षणं विकसित होत नाहीत. जरी लक्षणं अस्तित्वात असली तरीही त्यांचे प्रकार आणि तीव्रता यात भिन्नता असते. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकी द्वारे प्रसारित होतो. या विषाणू संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात. प्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास रुग्णाच्या डोळे, फुफ्फुस, यकृत, अन्न नलिका, पोट, आतडे आणि मेंदू सारख्या सर्व अवयवांवर परिणाम होतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?
हे प्रामुख्याने मानवी सायटोमेगॅलोव्हायरसमुळे होते, ज्याला लसिका ग्रंथी व्हायरस देखील म्हणतात. हा व्हायरस एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर, बरेच वर्षे टिकून राहू शकतो आणि पुन्हा सक्रिय होऊ शकतो. हा व्हायरस गंभीर समस्या उत्पन्न करू शकतो, विशेषकरुन रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये.

बातम्या आणखी आहेत...