आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Shahajibapu Patil's Answer To Oppositions|Proud On Johnny Lever's Statement |on Field Giving OK Answer To Opposist!

शहाजीबापू पाटलांनी विरोधकांना सुनावले खडे बोल:जॉनी लिव्हर म्हटलय याचा अभिमान, विरोधकांना थेट मैदानात ओके उत्तर देणार!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी बेजार होणारा नाही. मला जॉनी लिव्हर म्हटलय याचा मला अभिमान आहे. लोकांना हसवणे यासारखे दुसरे अवघड काम नाही. अशाप्रकारे सांगोल्याचे 'झाडी-डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांनी विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

युवासेनेने गुरुवारी 'संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद' अशा घोषणा देत शहाजीबापूंवर टीका केली. याआधी शहाजीबापूंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांगोल्यात भाड्याचे बंगले देतो असे विधान केले होते. याविरोधात युवासेनेकडून त्यांच्याविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठाकरेंना हजार मतेही मिळणार नाहीत

टीकेला शहाजीबापूंनी त्याच भाषेत उत्तर दिले. सांगोला येथे शिवसेना नाहीच. उद्धव ठाकरेंना येथे हजार मतेही मिळणार नाही. येथे शिवसेना नव्हतीच. अशी खिल्ली त्यांनी उडवली. तर याठिकाणी आपणच शिवसेना घडवल्याचे ते म्हणाले. विरोधकांना आता थेट मैदानात उत्तर देणार आणि ओके असे उत्तर देणार. असेही ते म्हणाले.

खोके सोडा पेटीही पाहिली नाही

गेल्या काही दिवसात विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर 50 खोके एकदम ओके अशा स्वरुपाची टीका होत आहे. याला उत्तर देताना ते म्हणाले, ज्यांच्या डोक्यात खोके असतात त्यांना खोकेच दिसतात. आम्हाला आयुष्यात साधी पेटी पाहायला मिळाली नाही. असेही ते म्हणाले.

मिटकरी तुम्हाला राष्ट्रवादी कळली का?

राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरीला उत्तर देतांना ते म्हणाले, मिटकरी तुम्हाला काय राष्ट्रवादी कळली? 35 वर्ष राष्ट्रवादीत मी झिजलोय. जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली होती, त्यावेळची कॅसेट काढून पाहा. त्यात माझे 35 मिनिटांचे भाषण होते. तर छगन भुजबळांचे 10 मिनिटांचे भाषण होते. मला वाटते मिटकरी बोलत नसावेत. त्यांना कोणीतरी सांगतय. बापूंना बेजार करा. पण मी बेजार होणारा नाही. खरा सामना मैदानात होईल. तिथेच मी उत्तर देईल आणि मिटकरींनीही द्यावे.

बातम्या आणखी आहेत...