आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठा आरक्षणाच्या मुद्दायवरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाजाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले जात असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी शब्दात टीका केली आहे. 'एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत' अशा शब्दात आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही - शंभूराजे देसाई
प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेबाबत बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही टीका निंदनीय असल्याचे म्हटले आहे. तसेच, अशा प्रकारची टीका कदापी सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. मराठा समाज शासनाकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करत आहोत. सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.