आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Sharad Pawar । Cm Udhhav Thackrey । An Important Meeting Of Sharad Pawar And Uddhav Thackeray Was Held At Sahyadri Guest House

राज्यसरकार अनलॉकच्या दिशेने:शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथिगृहावर पार पडली महत्वाची बैठक; कोरोना, अनलॉक, इंधन दरवाढसह अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. कोरोनावरील निर्बंध तसेच दिवाळी, त्याबरोबरच इतर मुद्दयांवर आज चर्चा करण्यात आली. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून अनलॉक करून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार बैठकीत खालील मुद्यांवर झाली चर्चा

 • कोरोनामुळे आणि डिझेल महागाईमुळे अडचणीत असलेल्या वाहतुकदारांना दिलासा देण्याबाबत चर्चा
 • त्याचबरोबर हायवेवरील वाहतुक कोंडींवरील उपाययोजनेबाबत चर्चा
 • अवजड वाहनांवरील वाहतूक कर माफ अथवा कमी करणे
 • ट्रक आणि इतर अवजड वाहनांसाठी पार्किंग टर्मिनल उभे करण्याबाबतही चर्चा
 • याशिवाय हॉटेल्स, मॉल्स आणि सिनेमागृह, नाट्यगृह यांच्यासाठी असलेले कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबतही चर्चा
 • सिनेमागृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे, मात्र 50 टक्के क्षमतेची अट शिथिल करावी याबाबत चर्चा
बातम्या आणखी आहेत...