आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपवर घणाघात:'सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो, त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही'- शरद पवार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर'

भाजप नेते जयसिंग गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला. 'सत्ता गेल्याच्या नंतर त्रास होतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं असे शब्द वापरत असतील, तर त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही,' असा टोला पवारांनी लगावला.

मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी पवार म्हणाले की, 'सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं अशी शब्दं वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे. साहजिक माणसाने काही आशा, अपेक्षा ठेवावी. त्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यांनी मागेही सांगितले होते 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.' कालही ते असंच काही बोलले होते. पण, ठीक आहे, लोकं त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतात. ती अतिभावना असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे', असे मत पवारांनी व्यक्त केले.

'रावसाहेब दानवेंचा नवीन गूण मला कळाला'

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी परत भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, 'रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे. पण त्यांचा हा गूण मला माहिती नव्हता. त्यांची ज्योतिष्य अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिष्य शास्त्राचा जानकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. पण, सामन्य माणसे सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही,' असा सणसणीत टोला पवारांनी दानवेंना लगावला.

'केंद्राकडून सत्तेचा गैरवापर'

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. 'दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे,' असे म्हणत सरनाईक यांच्यावरील कारवाईचा पवारांनी निषेध केला.

'दिल्लीत वेगळे राज्य असेल तर राज्य चालवणे कठीण असते. लोकांची कामे करत असताना मदत करण्याऐवजी‌ केंद्र सरकार विरोधी पक्षाला नाउमेद करत आहे. त्याचे उदाहरण आज‌ पाहण्यास मिळाले आहे. आज जे सरकार चालू आहे, त्याला सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नैराश्यपणा भाजप नेत्यांमध्ये आला आहे, त्याचे हे प्रतिक आहे', असा टोला पवारांनी भाजपला लगावला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser