आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sharad Pawar Held Discussions With Former Foreign Secretary And Former Air Force Chief On The Backdrop Of Border Dispute

भारत-चीन तणाव:सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केली माजी परराष्ट्र सचिव आणि माजी हवाईदल प्रमुखांशी चर्चा

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून भारत-चीनदरम्यान सीमा वादावरुन तणाव सुरू आहे. 31 ऑगस्टला चीनने पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन केले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी चीन प्रश्नावर माजी परराष्ट्र सचिव विजय विजय गोखले आणि निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्याशी मुंबईतील निवास्थानी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार वंदना चव्हाण उपस्थित होते.

यावेळी चीन विषयाचे तज्ज्ञ विजय गोखले यांनी आपले अनुभव सांगितले. तसेच, सध्याच्या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. तर 1990 च्या दशकांमध्ये केलेल्या चीन दौऱ्याचे अनुभव सांगितल्याचे पवारांनी ट्विटरवरुन सांगितले. यावेळी पवारांनी दक्षिणेकडे वाढत असलेले चीनचे वर्चस्व हे गंभीर आहे. सोबतच श्रीलंका आणि नेपाळच्या धोरणांवरही अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्लाही पवारांनी केंद्र सरकारला दिला.

0