आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी विधेयक:शरद पवार यांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, खासदारांच्या 'त्या' कृतीचे समर्थन- देवेंद्र फडणवीस

नागपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी विधेयकाला विरोध केला नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पवार यांनी रविवारी राज्यसभेत झालेल्या प्रकारानंतर उपोषणाला बसलेल्या खासदारांच्या कृतीचे समर्थन केले आहे, असेही फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूर दौऱ्यावर कोरोना स्थितीचा आढावा घेतला. मेयो आणि एम्स रूग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी कृषी विधेयकावरून काँग्रेस आणि पवारांनाही टोला लगावला. 'राज्यसभेत तो प्रकार घडला नसता, विरोधी सदस्यांचे वर्तन अशोभनीय राहिले नसते, तर आज शरद पवारजी यांना उपोषण करावे लागले नसते. एक मात्र नक्की की, विरोधकांचे वागणे अशोभनीयच होते आणि याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही,' असे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...