आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक निर्णय अन् खळबळ:शरद पवार यांचे सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत; जाणून घ्या त्यांच्याकडे किती आहे संपत्ती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

82 वर्षीय शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. देशाच्या राजकारणातही त्यांच्या मताला किंमत असते. त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. म्हणजे गत 24 वर्षांपासून राष्ट्रवादीची संपूर्ण सुत्रे शरद पवारांकडेच आहेत. पण आता त्यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे.

शरद पवार यांच्या मते, त्यांना प्रदिर्घ काळापर्यंत राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण आता आयुष्याच्या या वळणावर मी जबाबदारीतून मुक्त झाले पाहिजे. पवार 1960 पासून राजकारणात सक्रिय आहेत. म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 63 वर्षे भारतीय राजकारणाला दिली आहेत. आता ते कुणाच्या खांद्यावर पक्षाचे ओझे टाकतात हे पहावे लागेल.

शरद पवारांची मालमत्ता

63 वर्षांच्या सक्रिय राजकीय प्रवासानंतर शरद पवार यांच्याकडे किती मालमत्ता आहे हे आता जाणून घेऊया. 2020 च्या राज्यसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार यांनी शपथपत्रात दिलेल्या तपशिलानुसार, त्यांच्याकडे जवळपास 32.73 कोटी रुपयांची संपत्ती होती.

2020 मध्ये, शरद पवार यांच्याकडे एकूण 25,21,33,329 रुपयांची जंगम व 7,52,33,941 रुपयांची स्थावर अशी एकूण 32.73 कोटी रुपयांची मालमत्ता होती. कर्जावर बोलायचे झाल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवारांच्या कुटुंबावर 2020 पर्यंत एकूण 1 कोटी रुपयांचे कर्ज होते.

शेअर बाजारातही गुंतवणूक

पवार कुटुंबीयांनीही शेअर्स, बॉण्ड्स व डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवले आहेत. याशिवाय 3 वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांकडे 88 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते. आजच्या तारखेत याच्या किंमतीचा अंदाज बांधता येईल.

याशिवाय शरद पवारांनी आपल्या नावाने एकही वाहन निवडणूक प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. पण पवार नेहमीच टोयोटा लँड क्रूझर व लक्सस एलएक्स 570 कारमध्ये फिरताना दिसतात. या दोन्ही अतिशय हायटेक कार आहेत. टोयोटा लँड क्रूझरची सध्याची किंमत 1.30 कोटींच्या आसपास आहे. तर Luxus LX 570 ची किंमत 2.40 कोटी रुपये असून, ही एक अतिशय आलिशान कार आहे.

६ वर्षात एवढी वाढली मालमत्ता

यासंबंधीच्या वृत्तानुसार, 3 वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये शरद पवार यांची एकूण संपत्ती 32.73 कोटींच्या आसपास होती. 2014 च्या निवडणुकीवेळी त्यांनी जाहीर केलेल्या तपशीलानुसार 6 वर्षात शरद पवार यांच्या संपत्तीत केवळ 60 लाख रुपयांची वाढ झाली होती. 2014 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी 20,47,99,970.41 रुपयांची जंगम व 11,65,16,290 रुपयांची स्थावर मालमत्ता अशी एकूण 32.13 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेलही म्हणाले - शरद पवारांनी आपल्या राजीनाम्यावर फेरविचार करावा. पवार म्हणतील तेच पक्षात होईल. पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच आहेत. तत्पूर्वी, जयंत पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते अश्रू आवरत म्हणाले - पवारांनी असा थेट राजीनामा देण्याची गरज नव्हती. पवारांशिवाय आम्ही जनतेपुढे कसे जाणार?

शरद पवारांशी संबंधित खालील बातमी वाचा...

विश्लेषण:शरद पवारांनी राजीनाम्याचा 'मास्ट्रर स्ट्रोक' आत्ताच का खेळला; अजितदादांचा वाढता दबदबा की, आणखी काही, जाणून घेऊ!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते मंगळवारी पवारांच्या 'लोक माझे सांगाती' नामक आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभाला जमले होते. प्रसार माध्यमांतही या पुस्तकातील रंजक किस्स्यांची चर्चा सुरू होती. पण अचानक पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली अन् कार्यक्रमाचा नूरच पालटला... येथे वाचा संपूर्ण बातमी...