आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणूक:कर्नाटकात 40 टक्क्यांचे सरकार ही काय भानगड? तेथे भाजप सरकारएवढी बदनामी कुणी केली नसेल - शरद पवार

निपाणी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात ४० टक्क्यांचे सरकार आहे असे म्हटले जाते पण ही नेमकी काय भानगड आहे कळायला मार्ग नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला. कर्नाटकातील प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. प्रचारात शेवटचा शेवटचा वार शरद पवारांनी भाजपवर केला.

बेळगाव कर्नाटकातील निवडणुकीसाठी आज प्रचार संपला असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी भाजपवर चांगलीच टीका केली.

भाजपला मणीपूर सांभाळता येईना

शरद पवार म्हणाले, मणिपूरसारखे लहान राज्य भाजप सरकारला सांभाळता येईना.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की, कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचे. त्यानंतर आम्ही या ठिकाणी उमेदवार दिले. उत्तम पाटील यांना निपाणीमधून संधी दिली.

कुठे थांबायचे हे कळत नाही

काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना टोल लगावत शरद पवार म्हणाले, निवडणुकीत चावी देणारे लोक खूप असतात, पण कुठे थांबायचे हे कळले नाही की अपघात होतो. माझ्याकडे 10 वर्षे कृषी खाते होते. 72 हजार कोटी कर्जमाफी केली, व्याजाचे दर 3 टक्क्यांवर आले. उत्तम पाटील यांना निवडून द्या, येथील उसाला दर वाढवून देण्याबाबत मार्गदर्शन करू.

पैशांवर माणसे फोडून सरकारची निर्मिती

शरद पवार म्हणाले की, धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात, त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवले पाहिजे. ही 40 टक्के काय भानगड आहे हे कळेना. कर्नाटकची आजवर इतकी बदनामी कुणीही केली नाही जितकी भाजप सरकारने केली. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते. पण तसे कर्नाटकात झाल्याचे दिसत नाही.

मणिपूर वाचवण्यासाठी पराकाष्ठा करा

​मणिपूरमध्ये गेले 6 दिवस संघर्ष सुरू आहे, अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले सांगत शरद पवार म्हणाले की, ज्यांच्या हातात देश आहे त्यांना मणिपूर सारखे राज्य सांभाळता येत नाही. मणिपूर कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा.