आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातला चाणक्य:शरद पवारांच्या राजीनाम्याने अजितदादा चेकमेट; विरोधकांना कात्रजचा घाट, जाणून घ्या 8 कलमी पावर गेम!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात 2 मे 2023 रोजी एक इतिहास लिहिला गेला. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि हलकल्लोळ माजला. पक्षातल्या नेत्यांनी सभागृहात ठिय्या मांडत त्यांना माघार घेण्याची विनंती केली. आता निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला.

सारे चित्र पाहता शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याची घोषणा केली. मग पवारांच्या या खेळीने काय साधले, हा प्रश्न निर्माण होतो. याचीच उत्तरे जाणून घेऊन 8 मुद्द्यांच्या आधारे.

1) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. त्यानंतर पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष राहण्यात स्वारस्य उरले नव्हते. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा दिला. अन् सारे चित्रच पालटले.

2) शरद पवारांनी राजीनामा दिला. त्यानंतर देशभरातल्या राजकीय नेत्यांनी फोन करून त्यांना राजीनामा मागे घ्यावा ही विनंती केली. त्यामुळे अजूनही शरद पवारांचे राष्ट्रीय स्तरावरचे महत्त्व किती मोठे आहे, हे समोर आले.

3) नीतीश कुमार यांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, आता सध्या शरद पवारांना वाढता पाठिंबा पाहता त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करायचे असल्याची गळ अनेकांनी घातली आहे.

4) शरद पवार राजीनामा देणार हे कोणालाही माहिती नव्हते. त्याला फक्त त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, पुतण्या अजित पवार आणि पवारांची पत्नी प्रतिभा पवार हे अपवाद होते. इतर नेते, कार्यकर्त्यांना याची तसूभरही कल्पना नव्हती. त्यामुळे जयंत पाटील यांच्यापासून साऱ्यांचेच डोळे पाणावले.

5) महाराष्ट्रात शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून अजितदादांकडे पाहिले जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी अजितदादा बंड करणार आणि काही आमदारांसोबत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगला होत्या. आता या खेळीला शरद पवारांच्या राजीनाम्याने पूर्णविराम दिला.

6) राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढला. त्यात 83 वर्षात पर्दापण करणारे शरद पवार पदावर राहिले असते, तर पक्षात फूट पडली असती. त्यामुळे शिवसेनेसारखे बंड घडले असते. विशेषतः सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर याची भीती जास्त होते. मात्र, त्याला पवारांच्या या खेळीने खो दिला आहे.

7) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असती, तर शरद पवारांच्या प्रतिमेला धक्का लागला असता. मात्र, पवारांनी राजीनामा दिला आणि पक्षातले सारे नेते एकत्र आले. विशेष म्हणजे त्यांना पवारांची मनधरणी करावी लागली. यातून पवारांनी आपणच एकमेव नेते असल्याचे दाखवून दिले.

8) शरद पवारांच्या राजीनाम्याने पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि इतर पक्ष, मतदारही त्यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फक्त शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच अधिक महत्त्व असल्याचे दिसून आले. तात्पर्य काय, तर शरद पवारांनी ऐन अस्थिरतेच्या भोवऱ्यात पक्षाचा खुंटा हालवून पुन्हा घट्ट केल्याचे दिसून येते.

संबंधित वृत्तः

शरद पवारांनीच अध्यक्षपदी रहावे, 16 सदस्यांच्या समितीने राजीनामा फेटाळला; प्रफुल्ल पटेलांची माहिती

लोक माझे सांगाती:राजीनामा फेटाळल्याचे कळवले, पण शरद पवारांनी वेळ मागितला; प्रफुल्ल पटेलांची माहिती

लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन

82 वर्षांच्या शरद पवारांनी NCP चे अध्यक्षपद सोडले, कार्यकर्ते नाराज; अजितदादा म्हणाले - फेरविचारासाठी साहेबांनी मागितला वेळ

भाकरी फिरवणार:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, यापुढे निवडणूकही लढवणार नाही