आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''राष्ट्रवादी पक्षाचा 1099 ला जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार आहेत.'' असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केला.
''आपणच जातीपातीतून बाहेर पडणार नसू तर मग हिंदू कधी होणार असा सवाल करून महाराष्ट्र जातीपातीत खितपत पडला'' असे विधान राज ठाकरे यांनी केले. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आज आयोजित सभेत ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “जातीपातीचे राजकारण काही लोकांना हवे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्याआधीही जात होती, पण जातीचा अभिमान होता. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
जातीपातीत अडकून पडणार असू तर कसले हिंदुत्व आपण घेऊन बसलो. हिंदू केवळ हिंदू-मुस्लीम दंगलीतच हिंदू असतो. राष्ट्रीय उत्सवाला तो भारतीय असतो. चीनने आक्रमण केले की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत? हिंदु आणि भारतीय नसतो तेव्हा तो मराठी, गुजराती, तमीळ, बंगाली, पंजाबी होतो आणि जेव्हा मराठी असतो त्यावेळी तो मराठा, ब्राह्मण, माळी होतो असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र जातीभेदात खितपत पडला
बाबासाहेब पुरंदरेंनी लिहीला ते ब्राम्हण मग त्यांनी चुकीचे लिहले असणार आम्ही इतिहास वाचत नाही शिवाजी महाराजांना जाती-पातीची संकल्पना मान्य नव्हती. महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली पण तो महाराष्ट्र जातीभेदात खितपत पडला. अजून किती वाईट अवस्था महाराष्ट्राची करायची. जेम्स लेन हा भिकारडा त्याने जिजाऊंबद्दल काय लिहिले माहीतच आहे आ्म्हीच आमची अब्रू काढतो त्यावरून इथे राजकारण जाणून बुजन तापवले जाते आपणही त्याच्यावर चर्चा करीत बसतो याची लाज वाटते.
आम्हाला कसलेही भान नाही. निवडणूकीत जनतेला पैसे वाटून वेडेपीसे करायचे असा प्रघात सुरू आहे. जातीपातीतून आपण बाहेर येत नाही. हिंदु म्हणून आपण कधी एक होणार आहोत असा सवालही त्यांनी केला.
आपलेच लोक आपल्याला ओरबडतात
विविध संस्कृती इथे नांदतात. स्वातंत्र्याआधी हा देश एक भुमी होती कुणीही यायचे व सत्ता चालवायची सुमारे आठशे वर्षे देश पारतंत्र्यात होता पण मोगल आपली भाषा, संस्कृती काहीही हिसकाऊन नेऊ शकले नाहीत पण आपलेच लोक आपल्या लोकांना ओरबाडत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.