आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण:उत्तर प्रदेश सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, जनतेचा रोष योग्यच; शरद पवारांचा योगी सरकारवर निशाना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसचे, या घटनेनंतर जनतेतून येत असलेली रिअॅक्शन योग्य असल्याचेही पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

यावेळी पवार म्हणाले की, 'मृतदेहाची परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार देशात कधी घडला नाही. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी कायदा हातात घेऊन टोकाची भूमिका घेतली. देशभरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी असे वागायला नको होते. देशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन ही योग्यच आहे.'

'उत्तर प्रदेश सरकारने पीडित तरुणीचा मृतदेह कुटुंबियांना का दिला नाही ? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता ? याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे', अशी टीकाही पवारांनी यावेळी केली.