आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पक्षप्रवेश:नारायण राणेंच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये दाखल

सिंधुदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते नारायण राणेंच्या बंगल्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

मालवणमधील नारायण राणे यांच्या ‘नीलरत्न’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुलाबराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांच्यासह पुत्र आणि आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

कोण आहेत गुलाबराव चव्हाण?

गुलाबराव चव्हाण हे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि सहकार क्षेत्रातील मोठं नाव आहे. मागील 30 वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदाची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.