आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची पत्रकार परिषद:लखीमपूरच्या घटनेनंतर मावळ घटनेचा होतोय उल्लेख, आता पवारांनी सांगितले 'त्या' दिवशी नेमके काय घडले! स्वतःला मुख्यमंत्री समजणाऱ्या फडणवीसांनाही चिमटा

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली आहे. तसेच मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावले. मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हे तर पोलिस जबाबदार होते, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे.

लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चिरडल्याच्या घटनेचा निषेध करत या घटनेची तुलना शरद पवार यांनी जालीयनवाला हत्याकांडाशी केली. यानंतर फडणवीस यांनी मावळमधील घटनेचा उल्लेख करत ही घटना जालीयनवाला हत्याकांड वाटली नाही का? असा सवाल शरद पवारांना केला. या प्रश्नाला शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

शरद पवार यांनी पुढे बोलताना आता मावळबद्दलचं चित्र पूर्वीपेक्षा फार स्पष्ट झालं आहे. मावळमध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्याकाळी सत्ताधारी पक्षाबाबत लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. पण आज मावळमधील लोकांना लक्षात आले आहे की ज्यांच्यावर आपण आरोप केले, त्यांचा याच्याशी संबंध नव्हता. याउलट ही परिस्थिती हाताबाहेर जावी, यासाठी स्थानिक भाजपच्या लोकांनी प्रोत्साहित केले आणि त्यामुळे संघर्ष झाला. म्हणून मावळमध्ये जो संताप होता, ते चित्र आता बदलले आहे, असे शरद पवार म्हणाले.

पवारांचा फडणवीसांना सल्ला

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातला मावळचा गोळीबार झाला, याच काळात लोकांना भडकवण्याचे काम कुणी केले हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर आता झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके 90 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. जर संताप असता, तर इतक्या मतांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती. म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचे उदाहरण काढले ते बरे झाले. जर त्यांनी मावळमधली परिस्थिती समजून घेतली, तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा सल्ला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

स्वतःला मुख्यमंत्री समजणाऱ्या फडणवीसांना चिमटा
आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचीही शरद पवार यांनी खिल्ली उडवली. पाच वर्ष सत्तेत असल्याचे स्मरण राहणे हे कधीही चांगले. वेदना किती खोल आहे हे यातून दिसते, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...