आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sheena Bora Murder: Indrani Mukherjee's Bail Plea Rejected Again, Based On Threat Of Corona Infection, The Court Had Sought Bail

शीना बोरा हत्याकांड:इंद्राणी मुखर्जीचा जामीन परत एकदा फेटाळला, कोरोना संक्रमणाचा धोका असल्याचे सांगत जामीन मागितला होता

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी बुधवारी जामीन अर्ज फेटाळून लावला
Advertisement
Advertisement

विशेष सीबीआय न्यायालयाने शीना बोरा हत्येतील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा अंतरिम जामीन बुधवारी फेटाळला आहे. मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात बंद इंद्राणीने मागच्या महिन्यात कोरोनाचा धोका असल्याचे सांगत, जामीन देण्याची विनंती केली होती.

यापूर्वी चार याचिका फेटाळल्या

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी बुधवारी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळून  लावला. न्यायालयाने यापूर्वी इंद्राणीच्या चार याचिका फेटाळून लावल्या आहेत. 

कोरोनाचे कारण सांगून मागितला जामीन

आपल्या याचिकेत इंद्राणी मुखर्जीने कोरोना व्हायरस आणि आपल्या मेडिकल इतिहासाचे कारण देत 45 दिवसांसाठी जामीन मागितला होता. याचिकेत म्हटले की, ऑगस्ट 2015 मध्ये अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना मेंदूसंबंधी आजार झाला आहे. त्याला पाहून जामीन मंजूर करावा.

Advertisement
0