आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबा आमटेंच्या नातीची आत्महत्या:आमटे कुटुंबातील तिसरी पिढी; 2003 मध्ये वैद्यकीय शिक्षण घेताच हाती घेतला होता बाबा आमटेंचा वारसा, नेमक्या कोण होत्या शितल आमटे...

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

कोण होत्या शीतल आमटे ?

डॉ. शीतल आमटे या बाबा आमटे यांचे पुत्र विकास आणि सुन भारती आमटे यांच्या कन्या होत्या. 2003 मध्ये नागपूरमधून वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घरातील समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आणि आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतले होते.

आमटे कुटुंबातील वाद...

2016 मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आणि यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना पद देण्यात आले. यादरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिवपदाचा राजीनामा दिला. डॉ. शीतल आमटे-कराजगी आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होत्या. त्यांचे पती गौतम-कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, गौतम कराजगी आनंदवनाच्या कामकाजात एखाद्या व्यावसायिक कंपनीसारखे व्यवहार आणण्याचा प्रयत्न करत होते. यामुळेच आमटे कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

यानंतर डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी सोमवारी 20 नोव्हेंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. शीतल यांनी सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले. परंतू, एका तासानंतर शीतल यांनी तो फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओ काढून टाकला. यानंतर आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करत डॉ. शीतल आमटे यांचे आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आज डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले यामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser