आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचा संतप्त सवाल:शिंदे तुम्हीच सांगा, 302 चा गुन्हा कुणावर?

नांदेड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही, त्यामुळे कुटुंबाचा प्रपंच कसा चालेल?, या विवंचनेत या शेतकऱ्याने स्वतःला संपवले, असे त्याच्या पत्नीने सांगितले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही मला सांगा ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा, असा संतप्त प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार पाहणी करण्यासाठी शनिवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी माहूर तालुक्यातील दत्तमांजरी, खुपटी याठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे होते.

राज्यपालांच्या वक्तव्याने मराठी मनाला वेदना राज्यात सर्वोच्च पद असलेल्या राज्यपालांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे मराठी भाषिकांच्या मनाला वेदना झाल्या असून त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून राज्यात वाद निर्माण करू नये, असे मत पवार यांनी शनिवारी सायंकाळी वसमत येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...