आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Shirdi Now Produces 1200 Liters Of Oxygen Per Minute, Online Inauguration By The Chief Minister Uddhav Thackeray

दिव्य मराठी विशेष:शिर्डीत आता रोज मिनिटाला 1200 लिटर ऑक्सिजन निर्मिती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑलाइन लोकार्पण

नवनाथ दिघे । शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर ‘रिलायन्स’चा पुढाकार
  • 300 रुग्णांना लाभ, दीड हजार चाचण्या, दोन तासांत रिपोर्टही

येथील साईबाबा संस्थान रुग्णालयात रिलायन्सने दोन कोटी खर्चून उभारलेल्या ऑक्सिजन प्लँटमुळे १२०० लिटर प्रतिमिनिट एवढी हवेतून मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली असून त्याचा ३०० रुग्णांना लाभ होत आहे. अत्याधुनिक आरटीपीसीआर लॅबसाठीही जवळपास एक कोटी खर्च रिलायन्सने केला अाहे. आता रोज दीड हजार रुग्णांच्या चाचण्याही होणार असून दाेन तासांत रिपोर्टही मिळणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचे मंगळवारी (दि. १८) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण झाले.

शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या संकल्पनेचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिल्यानंतर रिलायन्स फाउंडेशनने त्यासाठी पुढाकार घेतला व साईभक्त के. व्ही. रमणी यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकार झाला. शिर्डीतील प्राणवायूचा हा प्रकल्प अनेकांना जीवदान देणारा ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संस्थानच्या निर्णयाचे कौतुक केले.

प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी ठाकरे म्हणाले, शिर्डी संस्थानने दिलेल्या ५१ कोटी रुपयांच्या मदतीचा विनियोग सामाजिक मदतीसाठी होत आहे. गोरगरिबांसाठी अडचणीच्या काळात हा प्रकल्प साकारल्याने बगाटे यांनी एक प्रकारे साईबाबांच्या विचारांची जपवणूक केली आहे. जास्तीत जास्त प्लँटची निर्मिती केल्यास राज्याला लागणाऱ्या दैनंदिन तीन हज़ार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, रवींद्र ठाकरे, बाबासाहेब घोरपडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून ‘दिव्य मराठी’चे कौतुक
प्रकल्प उभारण्यामागची संकल्पना ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम ठळकपणे प्रसिद्ध केली होती. त्याचा संदर्भ घेऊन बगाटे यांनी ‘दिव्य मराठी’ व सीनियर रिपोर्टर नवनाथ दिघे यांचा प्रास्ताविकात आवर्जून उल्लेख केला. तसेच अंबानी यांनीही तातडीने दखल घेत रिलायन्स फाउंडेशनद्वारे सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळेच हा प्रकल्प साकार होऊ शकला, असे बगाटे यांनी सांगताच मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी टाळ्या वाजवून ‘दिव्य मराठी’चे कौतुक केले.

बगाटे यांच्या कामाची दखल
कोविड सेंटर, हॉस्पिटल सुरू करून संस्थानने आरोग्य सुविधा दिल्या. ऑक्सिजन प्लँटची निर्मिती करत बगाटे यांनी आदर्शवत काम केले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्र्यांनी बगाटे यांच्या कामाची दखल घेतली.

बातम्या आणखी आहेत...