आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅनरबाजी:मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी लावले भाजपा प्रदेश कार्यालयाचे बॅनर

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीकडून वर्षा राऊत यांना नोटीस

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने रविवारी समन्स बजावला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने रविवारी यासंदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर आज मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालय असा बॅनर लावला आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर बॅनर लावल्यानंतर पोलिस अधिकारी या ठिकाणी पोहचले. पण, शिवसैनिकांनी त्यांना बॅनर काढू दिले नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा, असे शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितले. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser