आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदलाबदल:काँग्रेसला मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे ! भास्कर जाधवांना शुभेच्छा : देवेंद्र फडणवीस

रायगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणारे भास्कर जाधव यांच्या नावावर एकमत

पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून काम करताना १२ भाजप आमदारांविरोधात निलंबनाची कारवाई तसेच दुसऱ्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे प्रति विधानसभा घेण्याचे प्रयत्न उधळून लावल्यामुळे अचानक प्रकाशझोतात आलेले शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते भास्कर जाधव यांच्यावर विधानसभा अध्यक्षाची नवी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आघाडीच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चाही झाली आहे. ही माहिती खुद्द भास्कर जाधव यांनीच दिली. विधानसभा अध्यक्षपदावरून नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर अद्याप ते पद रिक्तच आहे. या पदाच्या निवडणुकीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये पत्रयुद्ध झाले. आघाडीच्या जागावाटपात अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. आता काँग्रेसमध्येच या पदावरून खेचाखेची सुरू आहे. पटोले यांनी अध्यक्षपद सोडल्यावर त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. मात्र पटोले यांनी मंत्रिपदावर डोळा ठेवून अध्यक्षपद सोडले आहे. आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकण्यासाठी नाना पटोले आणि काँग्रेसमधील मराठा नेत्यांची लॉबी सक्रिय झाली आहे.

मंत्रिपद सोडून शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये
आघाडीतील राजकीय घडामोडींबाबत शनिवारी रत्नागिरी येथे भास्कर जाधव यांना छेडले असता, शिवसेनेने आपल्या कोट्यातील मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले, तर चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असे तिन्ही पक्षांचे मत आहे. तशा प्रकारची अनौपचारिक चर्चादेखील झाली. मात्र शिवसेनेकडील वन खाते तसेच राहून सर्वसंमतीने जर विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर शिवसेनेने घ्यावे, अन्यथा शिवसेनेने आपले मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये. कारण एक तर शिवसेनेला महत्त्वाची खाती नाहीत तसेच मंत्रिपदेही कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेने स्वतःचे मंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे जाधव म्हणाले. जाधव हे चिपळूण-गुहागरचे आमदार आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

भास्कर जाधवांना शुभेच्छा : देवेंद्र फडणवीस
भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र पदावर गेल्यावर त्यांनी किमान नि:पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

रिक्त वनमंत्रिपद सोडणार
डिसंेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात कदाचित अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. मात्र नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांच्या दबंग कामगिरीनंतर अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी शिवसेनेने आपल्या वाट्याचे वनमंत्रिपद सोडावे, असाही प्रस्ताव आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रिपदही रिक्तच आहे. त्यामुळे पदांची अदलाबदल करण्याचा विचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...