आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त विधानाचे पडसाद:शिवसैनिकांनी पुण्यातील भाजप कार्यलयात कोंबड्या सोडून केला नारायण राणे यांचा निषेध, औरंगाबादेतही राणेंच्या फोटोला जोडे-मारो आंदोलन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून लागले आहेत.

शिवसैनिक आक्रमक झाले असून आंदोलन, पोस्टरबाजी करत आहेत. नाशिकमधील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करून त्याची तोडफोड केली.

भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या

तसेच पुण्यामध्ये शिवसेना कार्यकर्ते कोंबड्या घेऊन आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजीही करत आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी भाजप कार्यलयात कोंबड्या सोडून राणे यांचा निषेध केला आहे.

औरंगाबादमध्येही शिवसेनेकडून आंदोलन

औरंगाबादेतील क्रांतिचौक येथेही शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांसमवेत हातात कोंबड्या घेऊन घोषणाबाजी करत नारायण राणेंचा निषेध केला. दानवे यांनी देखील राणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. आंदोलनादरम्यान हातात कोंबडी घेऊन फोटोला चपला देखील मारण्यात आल्या.

नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक

संतापलेल्या शिवसैनिकांनी नाशिकमध्ये भाजपचे कार्यालयाच फोडले आहे. जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. शिवसैनिक गाडीत बसून आले यानंतर शिवसैनिकांवर या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. दरम्यान शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत होते. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात उत्तम प्रकारे सावरले आहे. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल असे शिवसैनिकांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...