आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, शिंदेंना किरकोळ दुखापत

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात एकनाथ शिंदेंना किरकोळ दुखापत झाली असून, गाडीचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गाडीला नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. यात अपघातात शिंदेंच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघरमधील कऱ्हे तलावली येथील एका घरात एकनाथ शिंदेंचा फोटो ठेवून जादु टोना करुन शिंदेंच्या जीवाला धोका पोहचवण्यासाठी प्रथांचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले होते. याबाबत एकनाथ शिंदेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच, अशा अघोरी घटनांवर विश्वास ठेवायची गरज नाही. असे शिंदे म्हणाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser