आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Shiv Sena Leader Sanjay Raut Comment; Indian Medical Association (IMA) Writes To Maharashtra CM Uddhav Thackeray

वक्तव्य भोवलं:'संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांचं खच्चीकरण झालं', मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉक्टरांनी व्यक्त केली नाराजी, केली राजीनाम्याची मागणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र रेजिडेंट डॉक्टर्स (एमएआरडी) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनकडून राऊतांच्या वक्तव्याला अपमानजनक म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे
  • संजय राऊतांनी यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पित्यावर दूसऱ्या लग्नाचा आरोप लावत भाष्य केले होते

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर संजय राऊत पुन्हा एकदा अडचणी सापडले आहेत. त्याने यावेळी डॉक्टरांवर भाष्य केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्र रेजिडेंट डॉक्टर्सने त्यांच्यावर अपमान केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आणि महाराष्ट्र रेजिडेंट डॉक्टरांकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच त्यांना राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र पाठवण्यात आले. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांचं खच्चीकरण झालं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते राऊत?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असे विधान केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत असून माझ्याकडून त्यांचा अपमान झालेला नसल्याचं म्हटलंय. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...