आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेळगाव महापालिकेत भाजपने 36 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवली. बेळगावमधील महाराष्ट्र एकिकरण समितीचा पराभव झाल्यामुळे संजय राऊत यांनी भाजपवर चांगलीच टीका केली होती.
बेळगावमधील पराभव मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचं की नाही ते आधी स्पष्ट करा असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला.
'महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसंच, दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत यांनी भजपला सवालही केले यामध्ये दोन अपेक्षा सांगितल्या आहेत. 1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा 2)बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा, असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.