आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांनी पुन्हा डिवचले!:नारायण राणेंनी त्यांच्या खात्याचा विकास करा, उगाच बडबड करु नका; आमच्या अंगावर याल तर ही शिवसेनाच आहे, राऊतांचा इशारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खातं देण्यात आलं आहे. त्या खात्याचं काम करण्यासाठी तुम्हाला मंत्री नेमलं आहे. त्या खात्याचा विकास करा. उगाच बडबड करु नका. शहाणपणा कराल, आमच्या अंगावर याल तर ही शिवसेनाच आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आम्ही टीकेचं स्वागत करतो -

'आम्ही टीकेचं स्वागत करतो आणि विधायक स्वरुपात घेतो. टीका बाळासाहेब ठाकरेंवर देखील होत होती. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की राजकारणात दोन घ्यायच्या असतात आणि दोन द्यायच्या असतात. ज्या भाषेत टीका व्हायची ती टीका सगळ्यांनी स्वीकारली आहे. पण आता जी होतेय त्याला टीका म्हणत नाही त्याला गटारात तोंड बूडवून थूंकणं म्हणतात. पण तुमचंच तोंड खराब होत आहे, हे लक्षात घ्या,' असंही राऊत म्हणाले.

एखाद्या राज्याचा अपमान कराल तर देश तुम्हाला माफ करणार नाही -

महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही म्हणजे काय? पश्चिम बंगालमध्ये तुमचा पराभव झाला, हे लक्षात घ्या. पश्चिम बंगालमधून तुम्हाला पळून जावं लागलं. महाराष्ट्रातून देखील तुम्हाला नामशेष केलं जाईल, अशी भाषा वापरात असाल तर! पश्मिम बंगाल देशाचा भाग आहे. क्रातीकारकांची भूमी आहे. लाल-बाल-पाल हा त्रिशूल जो आहे त्यातील एक टोक बंगालचं आहे हे लक्षात घ्या, त्याच त्रिशुलाचं टोक तुमच्यात घुसलं आहे. एखाद्या राज्याचा अपमान कराल तर देश तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे.

तुम्ही एक केंद्रीय मंत्री आहात, तुम्ही देश समजून घ्या मग तुम्ही राजकाराणावर बोला. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात ते तुमच्या खात्याचं काम करायला तुम्हाला मंत्रिपद देण्यात आलं आहे. इथे येऊन बकाल करायला तुमचं खातं नाही आहे. तुम्ही तुमचं खात मजबूत करा, देशाला दिशा द्या, रोजगार द्या, आम्ही तुमचं स्वागत करु. इथे येऊन बकवास करु नका हे मी आता सांगतोय…आणि शहाणपणा कराल, आमच्या अंगावर याल तर एक लक्षात घ्या ही शिवसेनाच आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...