आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीची कारवाई:शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची 72 कोटींची संपत्ती जप्त

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने मालमत्ता जप्त केली आहे. प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांची पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर काही दिवसांपूर्वी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. या अटकेनंतर आता ईडीने प्रवीण राऊत यांची 72 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय समन्स बजावले होते. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते.

बातम्या आणखी आहेत...