आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Shiv Sena Leaders Have Huge Wealth Due To Corruption, Everyone Should Be Questioned; Congress Leader Attacks Shiv Sena

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:भ्रष्टाचारामुळे शिवसेना नेत्यांकडे प्रचंड संपत्ती, सर्वांची चौकशी व्हावी; काँग्रेस नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारी केली

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारी केली. सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्या. तसेच, त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी या कारवाई मागे केंद्र सरकारचा हात असल्याचे म्हटले. पण, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवरच जोरदार हल्लाबोल केला.

माध्यमांशी बातचीत मध्ये निरुपम म्हणाले की, 'शिवसेना भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारामुळे शिवसेना नेत्यांकडे प्रचंड संपत्ती आहे. मला माहित नाही की, सरनाईक यांनी काय काय केलं आहे. पण, याप्रकरणी राजकारण न होता, प्रताप सरनाईक यांची चौकशी व्हावी.' यासोबतच निरुपम पुढे म्हणाले की, 'फक्त सरनाईकच नाही, तर शिवसेनेच्या इतर अनेक नेत्यांनी भ्रष्टाचारातून भरपूर संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे फक्त राजकीय द्वेशातून या प्रकरणाकडे न पाहता, त्या सर्वांचीही ईडीमार्फत चौकशी व्हावी,' असे मत निरुपम यांनी व्यक्त केले.

काय आहे प्रकरण ?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. सध्या शोधमोहीम सुरु आहे. यासोबतच सरनाईकांसंबंधीत इतर 10 ठिकाणांवरही ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या मुलांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले होते. तसेच ईडीने विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser