आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमित चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्यवसायातील भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'टॉप्स सिक्युरिटी' या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना अटक केली आहे. कंपनीतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. आता अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 12 तासांच्या चौकशीनंतर अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser