आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळणीवर शिवसेनेचा नवा अ‍ॅंगल:संजय राऊत म्हणाले - जर गांधींऐवजी गोडसेंनी जिनांना मारले असते तर देशाचे विभाजन झाले नसते; फाळणीचा स्मृतिदिन साजरा झाला नसता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीची तुलना भारताच्या फाळणीच्या काळाशी केली आहे. त्यांनी एक नवा अॅंगलही जोडला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधील 'रोखठोक' या आपल्या साप्ताहिक कॉलममध्ये संजय राऊत यांनी लिहिले की, अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती भारताच्या फाळणीसारखीच आहे. देशाचे अस्तित्व आणि सार्वभौमत्व गमावणे किती वेदनादायक आहे याची आठवण तेथील परिस्थिती आहे.

फाळणीचा दिवस विसरु नका, असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असं सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या मते, महात्मा गांधींच्या जागी नथुराम गोडसेंनी मोहम्मद अली जिना यांची हत्या केली असती तर देशाची फाळणी रोखता आली असती. तसे असते तर 14 ऑगस्टला फाळणीचा स्मृती दिन साजरा करण्याचीही गरज पडली नसती.

अखंड भारत होणे शक्य वाटत नाही
संजय राऊत यांनी लिहिले की जोपर्यंत फाळणीने विभक्त झालेला भाग परत देशात समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत फाळणीची वेदना कशी कमी होईल. एखाद्याला मानसिक शांती कशी मिळेल? अखंड भारत निर्माण झाला पाहिजे असे आम्हाला वाटते, पण ते शक्य वाटत नाही. आम्ही आशावादी आहोत. जर पंतप्रधान मोदींना अखंड भारत हवा असेल तर त्यांचे स्वागत आहे, परंतु पाकिस्तानच्या 11 कोटी मुस्लिमांबद्दल ते काय करतील हे त्यांना सांगावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...