आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे टीकास्‍त्र:'मोदी नामा'ची जादू उतरली, 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या प्रयोगावर ठरेल; '... नाहीतर जन आशीर्वादाच्या 'जत्रा' लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे जातील'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'2024 चे लक्ष्य' वगैरे ठीक आहे, मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. 'मोदी नामा' जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या 'जत्रा' लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना दिला आहे.

काय म्हटले सामनाच्या अग्रलेखात?

विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे, मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद 'जत्रा'सुरु केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्यशाप देण्याचेच काम सुरु केले. असे शिवसेनेने म्हटले आहे.

19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाडय़ांची डागडुजी करून त्यांना बरे स्वरूप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये. प. बंगालातील विधानसभा निवडणुकीत मोदी व शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. भाजपचा पराभव निवडणुकीच्या मैदानात आणि बुद्धिबळाच्या पटावरही करता येतो हे दोन राज्यांनी दाखवले. असेही लेखात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...