आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रीया:शिवसेना जिथे उमेदवार उभे करते तिथे डिपॉझिट जप्त होते, कधीच राष्ट्रीय पक्ष होणार नाही, रावसाहेब दानवेंनी उडविली खिल्ली

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. शिवसेना राज्याबाहेर जिथे जिथे उमेदवार उभे करते तिथे तिथे डिपॉझिट जप्त होते अशा शब्दात भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली.

उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने त्यांचे उमेदवार उभे केले. परंतू गोव्यात सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याची स्थिती आहे. उत्तरप्रदेशातही शिवसेनेची स्थिती वेगळी नाही. सध्या सुरु असलेल्या भाजप व शिवसेनेतील हल्ले- प्रतिहल्ल्यांत रावसाहेब दानवे यांनीही उडी घेत शिवसेनेच्या पराभवावर खोचक टीका केली व खिल्लीही उडविली.

रावसाहेब दानवे म्हणाले, शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. हा पक्ष जिथे जाईल तेथे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल.’

देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असतनाच भाजपला चार राज्यात कौल मिळत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साह असून त्यांनी आता प्रतिक्रीया देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेती खिल्ली उडवत दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रीया दिली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश गोव्यातही पक्ष विस्ताराचे धोरण ठेवत शिवसेनेने नशीब आजमावले. गोव्यातही राष्ट्रवादीशी युती केली पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शिवसेनेला मोठे अपयश येत असल्याचे चित्र आहे.

जनताच हे सरकार पाडेल

2024 मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही ते काम जनताच करणार आहे. असेही वक्तव्य दानवेंनी केले.

युपी, गोव्यात शिवसेनेची दयनिय स्थिती

उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी शिवसेनेने 51 जागांवर निवडणूक लढवली. मात्र यात कुठेही शिवसेनेला खाते उघडता आले नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही येथे एकमेव उमेदवार उभा केला होता. अनुपशहर येथून ज्येष्ठ नेते के.के. शर्मा यांना उतरवण्यात आलं होते. मात्र त्यांचा येथे पराभव होताना दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...