आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे डिपॉझिट जप्त:गोव्यात शिवसेनेची हाराकीरी, सर्व दहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, नोटापेक्षाही पडली कमी मते

पणजी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा निवडणुकीत जनतेला वीज पाणी मोफत देण्याचे प्रलोभन देणाऱ्या, भाजपला हिणवणाऱ्या शिवसेनेवर मोठी नामुष्की ओढावली आहे. गोव्याच्या निवडणुक रिंगणातील सर्व दहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली. या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. एकप्रकारे गोवेकरांनी शिवसेनेला थाराही दिला नाही.

गोवा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेने मोठी तयारी केली होती. पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक प्रचार काळात तेथे तळ ठोकला होता. आदीत्य ठाकरे यांनी जोरदार प्रचारही केला होता, पण त्यांना गोवेकरांनी साथ दिल्याचे सध्यातरी दिसत नाही.

शिवसेनेने गोव्यात दहा ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. पण त्यांचा एकही उमेदवार निवडून येताना दिसत नाहीच परंतु या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होत असल्याचे चित्र आहे. त्यांना नोटापेक्षाही कमी मतदान मिळत असल्याची स्थिती आहे.

राष्ट्रवादीशी युती मात्र काँग्रेसला ठेवले दुर

गोवा निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीशी युतीही केली होती. परंतू काँग्रेसला दुर ठेवले होते. शिवसेनेची व काँग्रेसची युती करण्याबाबत बैठक झाली पण युती होऊ शकली नाही. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम् नाराजही झाले होते. जर युती झाली असती तर चित्र वेगळे असते अशी चर्चाही आता होताना दिसत आहे.

उमेदवारांचा प्रचार करतानाच शिवसेनेने गोवेकरांना मोफत वीज, पाणी देण्याचे प्रलोभन दाखविले. पण गोवेकरांनी ते सपशेल नाकारले. गोवेकरांनी शिवसेनेला पसंती दिली नाही.

बिफ पार्टी म्हणून भाजपला डिवचले

कोरोना काळात भाजपने भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप शिवसेनेसह इतर विरोधी पक्षाने केला होता. गैरव्यवहार होत असल्याचा ठपकाही भाजपवर या पक्षांनी ठेवला. हे भाजप नव्हे तर बिफ पार्टी असे म्हणुन भाजपला हिनवले होते. याच भाजपने आता निवडणुकीत सरशी घेतली असून त्यांना जनता कौल देत आहे.

गोव्यात शिवसेनेचे अपयशच

शिवसेना गोव्यात भाजपच्याही आधीपासून सक्रीय आहे. त्यानंतर आलेल्या भाजपने गोव्यात चांगलाच जम बसविला. उलटपक्षी शिवसेनेला मात्र गोव्यात साधा पंचही निवडुन आणता आला नाही. त्यांना या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नसल्याने वाघाची गुर्रगुर्र फक्त महाराष्ट्रापुरतीच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...