आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या शिवराज्याभिषेक सोहळा:राज्यभरातून शिवप्रेमी रायगडकडे रवाना; शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होणार

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात-शिवराज्याभिषेक घराघरांत’ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडकडे रवाना झाले आहे.

शिवप्रेमींमध्ये उत्साह

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा उद्या 6 जून 2022 रोजी रायगड इथे पार पडणार आहे. आणि पुण्यातून याच राज्यभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमी रायगडकडे रवाना झाले आहे. जय भवानी जय शिवाजी, अशी घोषणा देत महाराजांचा जयजयकार करत रायगडला निघाले आहेत.

रायगडावर आकर्षक रोषणाई

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार या सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने रायगड उजळून निघणार आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे. भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे. पुण्यातून दीड हजार तरुण शिवरायांचा जयघोष करत रायगडाच्या दिशेने निघाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या 29 बसमधून जय शिवराय असा घोषणा देत या मावळ्यांनी रायगडाच्या दिशेने कूच केले आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही रायगडवारी तरुणांना घडवून आणण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नितीमुल्य घडवली ती तरुणांना माहीत व्हावी यासाठी या रायगडवारीचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

असा होणार सोहळा

5 जून रोजी युवराज संभाजीराजे आणि शहाजीराजे पायी गड चढणार असून होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण होणार आहे. रायगड प्राधिकरणाच्या आत्तापर्यंतच्या कार्याचे सादरीकरण, जागर शाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हा कार्यक्रम होईल. तर 6 जून रोजी सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. युवराज संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या हस्ते दरबार पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होईल. शिवरायांच्या पालखीची प्रदक्षिणा होईल व त्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल

बातम्या आणखी आहेत...