आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन:'शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार' - शरद पवार

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन

आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मुंबईत झलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेवर स्थुतीसुमन उधळली आहेत. 'कधीच वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे', असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, 'हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलचपण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, 'या देशाने अनेक पक्ष पाहिले, काही टिकले, पण राष्ट्रवादीचे हे वैशिष्ट्य आहे. हे आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथे आपण वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...