आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोश्यारींना पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही:दिल्लीतील बादशहाच्या इशाऱ्यावरच वादग्रस्त वक्तव्य; दानवेंचा आरोप

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील पातशहाच्या इशाऱ्यावरच कोश्यारी अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचा दानवे यांचा आरोप.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने गिरगाव चौपाटी येथील शिवसेना शाखेजवळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी पोलिसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. राज्यपाल वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचा अपमान करत आहे. या आधी खील त्यांनी ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महापुरुषांचा अपमान केला आहे. दिल्लीतील पातशहाच्या इशाऱ्यावरच ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्राचे पाणी असे तसे नाही. कोश्यारी यांना पाणी पाजवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, असेदेखील दानवे म्हणाले.

सावरकरांविषयी आम्हाला शिकवू नका

सावरकरांविषयी शिवसेनेला कोणीही काही शिकवण्याची आवश्यकता नाही. शिवसेनाप्रमुखांपासून ते लाखो शिवसैनिकांनी आपल्या रक्ताने सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी पत्रे पाठवली आहेत. परवा जे सावरकरांविषयी गळा काढत होते ते काल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर शांत का बसले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे त्यांचे बेगडी हिंदुत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हे आदर करतात की, नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आम्ही सावरकरांविषयी आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराजांबाबत दातखिळी बसते का?

सावरकरांविषयी रस्त्यावर उतरणारे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्यानंतर रस्त्यावर का उतरले नाही? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केल्यानंतर तुमची दातखिळी बसेते का? असा आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्राला डॅमेज करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र ही महापुरुषांची आणि वीर पुरुषांची जननी आहे. असे असल्यामुळेच वारंवार महाराष्ट्राला डॅमेज करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ, शाखाप्रमुख व महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...