आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राम मंदिर भूमिपूजन:'शिवसेनेचे हिंदुत्व जगजाहीर, राम मंदिराबाबत कोणीही राजकारण करू नये'- आमदार प्रताप सरनाईक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या, 'राम मंदिर बांधून कोरोना कमी होईल असे काही लोकांना वाटत असेल', या वक्तव्यावरुन भाजपने महाविकास आघाडी आणि खासकरुन मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. यावर आता शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले आहे. 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पवारसाहेब जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. शिवसेनेचे हिंदुत्व जगजाहीर आहे,' असे सरनाईक म्हणाले.

सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत वक्तव्य केले. कोरोनाला प्राधान्य हवे. भाजपवाल्यांना राम मंदिर बांधून कोरोना कमी होईल असे वाटत असेल तर हरकत नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला. यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करुन, आता उद्धव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी पवारांच्या परवागीची गरज लागणार का असा सवाल विचारला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपवर पलटवार केला.

प्रताप सरनाईक यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांना पत्र लिहून, कोणतंही राजकारण न करता शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला निमंत्रित करा, असे म्हटले आहे. पत्रात प्रताप सरनाईक म्हणाले की, 'राम मंदिराबाबत कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्यांवर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा जगजाहीर आहे. आमच्या पक्षाच्या भूमिकेबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करु नये.'