आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजय ऊवाच':'उनसे कहना की, किस्मत पे इतना नाज ना करे, हमने...' असे म्हणत संजय राऊतांचा अप्रत्यक्षरित्या भाजपला टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. यानंतर मुंबई पोलिसांसह राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता शायराना अंदाजात संजय राऊतांनी याविषयावर एक खोचक ट्विट केले आहे.

आज संजय राऊतांनी शायरी करत भाजपला खोचक टोला लगावला आहे. ‘संजय ऊवाच’ या मथळ्याखाली त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. 'उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है…' यासोबतच या ट्विटखाली त्यांनी जय महाराष्ट्र असंही लिहिलं आहे. हे ट्विट नक्की नेकमे कोणत्या विषयासंदर्भात आहे याबद्दल राऊत यांनी थेट उल्लेख केलेला नसला तरी जय महाराष्ट्र या शब्दांवरुन हे ट्विट हे सुशांत प्रकरणावरुन असल्याचे स्पष्ट होतं आहे.

तसेच राज्यातील भाजपकडूनही सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी वारंवार केली जात होती. यामुळे राऊतांनी हा टोला अप्रत्यक्षरित्या भाजपालाच लगावला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देत आतापर्यंत जमा करण्यात आलेले पुरावेसीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...