आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भूमिपूजन सोहळा:'भगवान राम फक्त भाजपचे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे'-खा. विनायक राऊत

रत्नागिरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. याची अयोध्येत सध्या जोरात तयार सुरू आहे. परंतू, सोहळ्याच्या निमंत्रणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. 'भगवान राम फक्त भाजपचे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे', अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, 'राम मंदिर निर्मितीचा मार्ग ज्यांच्या प्रयत्नातून होत आहे, त्यांची जाणीव ठेवणे आज आवश्यक आहे. पण, दुदैवाने तसे होत नाही. कदाचित उद्धव ठाकरे रामजन्मभूमीत गेले तर राम मंदिराचे श्रेय शिवसेनेला जाईल, याची भाजपला भिती वाटत असेल. आता राम मंदिराचे भूमिपूजन पक्षाचे नाही तर राम भक्तांचे आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन भूमिपूजनाचा पर्याय सुचवला, तो योग्यच आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो लोकांना एकत्र बोलवणे योग्य नाही. असे केल्याने आयसीएमआरच्या निर्णयाचे हे उल्लंघन होईल,' असे राऊत म्हणाले.