आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:'एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंसारखा नॉन मॅट्रिक माणुस, दुर्दैवच'- खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमित शाहांना खुश करण्यासाठी राणे उद्धव ठाकरेंना शिव्या देतात

'एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल', अशी बोचरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.

यावेळी राऊत यांनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोन कॉलवरही भाष्य केले. ते म्हणाले की, 'नारायण राणेंनी एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तीन वेळा फोन आला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली. राणेंच्या हॉस्पिटलच्या आड कधीच शिवसेना आली नाही. उद्धव ठाकरेंकडे जेव्हा राणेंच्या हॉस्पीटलची फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. नारायण राणे गृहमंत्री अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचे काम करतात, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली.

बातम्या आणखी आहेत...